गिरणा पंपींग स्टेशन व नदीपात्रात श्री गणेश विसर्जनास बंदी

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका हद्दीतील सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्रात श्री गणेश विसर्जन करू नये असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

 

सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्र येथे धोकादायक परिस्थीती निर्माण झलेली आहे.  याकरीता मागील ४ -५ वर्षा पासून या ठिकाणी श्री गणपती विसर्जनास प्रशासनाकडुन बंदी घालण्यात आलेली आहे. आज देखील या दोन्ही भागात तशीच धोकादायक परिस्थिती असल्याने यावर्षी सुध्दा या ठिकाणी श्रीगणेश विसर्जनास बंदी  कायम ठेवण्यात आली आहे. तरी या दोन्ही ठिकाणी कोठलेही सार्वजनिक गणेश मंडळाचे,  घरगुती श्री.गणपती विसर्जन करु नये असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Protected Content