जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाघ नगर ते गिरणा पपींग रोडवरील मुख्य रस्त्यांवर असलेल्या रोडवरील पथदिवे बंद गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.
शहरातील वाघ नगर ते गिरणा पपींग रोडवरील मुख्य रस्त्यांवर असलेल्या रोडवरील पथदिवे बंद गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी या परिसरातील नागरीक शतपावली करत असतात. पथदिवे बंद असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून आश्वासन देवून वेळ मारून नेण्याचा प्रकार होत आहे. महापालिकेने या तक्रारीची दखल न घेतल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आली. तातडीने रस्त्यांवरील पथदिवे सुरू करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.