गिरडगाव येथे कोरोना योध्द्यांचा सत्कार

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या कोरोना योध्द्यांचा सत्कार तालुक्यातील गिरडगाव येथे नुकताच करण्यात आली.

कोरोना विषाणु संसर्गा च्या संकटमयी काळात जनहिताच्या आरोग्य रक्षणा करीता आपले जिव धोक्यात घालुनअहोरात्र परिश्रम घेवुन जनसेवा देणार्‍या कर्मचारी यांना तालुक्यातील गिरडगाव येथे कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधुन सध्या संपुर्ण महीनाभर विविध सामाजीक व सांस्कृतीक व शैक्षणीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रशांत भिमराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते गिरडगाव येथील अंगणवाडी मध्ये हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गावातील पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील सरपंच सौ. अलका मधुकर पाटील ,उपसरपंच आनंदा दगडु पाटील, ग्रामसेवक भोजराज फालक, शिपाई पांडुरंग पाटील, विश्‍वनाथ पाटील, क्लर्क सचिन पाटील, आशा वर्कर वंदना पाटील, अंगणवाडी सेविका युरोपा पाटील, मदतनीस चित्रा पाटील, मलेरिया डॉक्टर उषा पाटील, इंगळे मॅडम यांच्यासह अन्य कोरोना योद्धा यांचा सन्मान शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या प्रसंगी ओ. बी. सी. सेल सचिव दीपक सोनवणे, संघटक हर्षल पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, दिपक पाटील, सतीश पाटील हर्षल पाटील,रिषीकेश पाटील , किरण पाटील, समाधान पाटील, मयुर पाटील ,गुंजन पाटील इत्यादी मान्यवर ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

Protected Content