Home क्राईम गिरडगाव येथून आयशर ट्रकची चोरी; यावल पोलीसात गुन्हा

गिरडगाव येथून आयशर ट्रकची चोरी; यावल पोलीसात गुन्हा


यावल प्रतिनिधी । चोपडा यावल रोडवरील गिरडगाव येथे आयशर ट्रकची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, ईश्वर दिलीप लोधी (वय-३०) रा. साकळी ता. यावल हे ट्रक चालक आहे. ते आयशर ट्रक क्रमांक (एमएच ०४ जीआर ६४९७) वर चालक म्हणून काम करतात. त्यांनी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता यावल-चोपडा रोडवरील गिरडगाव येथे आयशर ट्रक पार्किंगला लावला होता. ते घरी निघून गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५ लाख रूपये किंमतीचा ट्रक चोरून नेल्याचे काल मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून ट्रक मिळाला नाही. ट्रक चोरल्याप्रकरणी त्यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे. 


Protected Content

Play sound