जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या परप्रांतीय तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील कारगिल चौकातून सोमवारी २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व काढतोस जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावठी पिस्तुल घेवून फिरणार्या परप्रांतीय तरुण अजित गुजर बारेला (वय-३७, रा. रंगराव आबा नगर मल्हापूरा ता. चोपडा, मूळ रा. पानसेमल जि. बडवाणी मध्यप्रदेश) हा चोपडा शहरातील कारगील चौकात अजित बारेला हा तरुण गावठी पिस्तुल घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ पोहेकॉ संदीप पाटील, गोरख बागुल, पोना प्रवीण मांडोळे, परेश महाजन यांचे पथक तयार करुन सोमवारी 2 जानेवारी रोजी कारवाई साठी रवाना केले. दरम्यान, पथकाला बघताच संशयित घटनास्थळाहून पळून होता. पथकाने पाठलाग करुन संशयित अजित बारेला याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.