यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला यावल पोलीसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल किनगाव रस्त्यावर गोलूसिंग दिलीपसिंग भाटीया (वय-२८) रा. सिगनूर पो. बेहरामपूरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) हा बेकायदेशी गावठी बनावटीचा कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांनी मिळाली. त्यानुसार सोमवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता यावल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत संशयित आरोपी गोलूसिंग भाटीया याला अटक केली आहे. त्याच्या जवळून ३० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा आणि विना क्रमांकाची दुचाकी हस्तगत केली आहे.
पोलीस नाईक अरून लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोलूसिंग दिलीपसिंग भाटीया याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.