गायीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील चिंचोली शिवारात गायीला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी एकावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील चिंचोली शिवारातील शेता एक जण  गायीला अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरस होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांना शुक्रवारी ८ एप्रिल रोजी दुपारी मिळाली. या व्हिडिओचा सत्यता पडताळण्यासाठी पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चव्हाण यांना रवाना केले. त्यानुसार त्यांनी चिंचोली गावातील पोलीस पाटील राकेश साठे यांना विचारपूस केली असता ही घटना चिंचोली शिवारातील दिवाकर भिला बडगुजर यांच्या शेतात घडलेले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी हे शिवारात गेले असता त्या ठिकाणी काठेवाडी लोकांचा पाडाव होता. व्हिडिओचे घटनेची विचारपूस केली असता यातील भरत धारा भरवाड (वय-२०) रा.पलासनेर ता. शिरपूर हल्ली मुक्काम चिंचोली शिवार ता यावल हा त्या ठिकाणी आला व सांगितले की काय ही गाय कोणालाही मारते व कोणाच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान करते. या कारणावरून ३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता गाईला संतापाच्या भरात काठीने मारहाण  केली त्यामुळे गाय जमिनीवर पडली अशी कबुली दिली.  या कारणावरून संशयित आरोपी भरत धारा भरवाड (वय-२०) याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार ८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.

Protected Content