गरुड विद्यालयात घंटा वाजली : विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत

शेंदुर्णी, प्रतिनिधी |  शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी  द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात आज घंटा वाजली आणि शाळा भरली. यावेळी  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा भरल्याचा उत्साह दिसून आला.

 

 

शाळा भरण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती  दिसून आली. शासनाच्या आदेशानुसार इयत्ता ८ वी ते १२ वी  पर्यंतची शाळा ही दिनांक ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी उदार यांनी गुलाब  पुष्प देऊन स्वागत केले, शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आधी संपूर्ण शाळेमध्ये सॅनिटायझची फवारणी करण्यात आली होती, त्याचप्रमाणे विद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मामीटर वर तापमान चेक करून त्याच पद्धतीने हात सॅनिटायझ करून तोंडावर मास्क लावून विद्यालयात प्रवेश देण्यात आला एका बेंचवर एक विद्यार्थी व दोन विद्यार्थ्यांमध्ये ठराविक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना कोरना संदर्भात मार्गदर्शक सूचना या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. उदार यांनी दिल्या व इथून पुढे शाळेचे कामकाज कशा पद्धतीने चालणार याबद्दल माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली यावेळी मुख्याध्यापक एस.पी उदार ,उपमुख्याध्यापक ए.बी ठोके ,सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती तसेच संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरूड,सचिव दाजीसाहेब सतीशजी काशिद, महिला संचालिका सौ उज्ज्वलाताई काशिद, सहसचिव भाऊसाहेब दिपक गरूड यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Protected Content