गरुड महाविद्यालयात उदयन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा

शेदुर्णी,प्रतिनिधी | कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे केसीआयआयएल आणि अ.र.भा.गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीच्या केआयडीसी  यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील नवतरुण उद्योजकांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

गरुड  महाविद्यालयाच्या आचार्य कॉन्फरन्स हॉलमध्ये उदयन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यशाळेमध्ये विद्यापीठाच्या वतीने सहभागी होणारे मार्गदर्शक निखिल कुलकर्णी उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे भविष्यात  महाविद्यालय KIEDC उद्योजकांच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने कार्य करेल त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त उद्योजकांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content