जळगाव संदीप होले। कोरोना आजाराच्या पार्शवभूमीवर जवळपास सगळ्याच व्यवसायांचे कंबरडे मोडलेले असताना आधीच गणेश मूर्ती विक्रेतेही यंदा प्रचंड धास्तावलेले आहेत. अपेक्षेप्रमाणे व्यवसाय होण्याबद्दल शंका असल्याने त्यांचाही जीव टांगणीला लागलेला आहे.
दरवर्षी उत्साहात आणि धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो परंतु यंदा कोरोनामुळे राज्यात गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी कोणत्याच निमित्ताने गर्दी जमायला नको, याची दक्षता सरकार आणि पोलिसांसह प्रशासनाकडून घेतली जात असल्याने यंदा गणेश मंडळांना प्रचंड नियम आणि अटींचे पालन करण्याच्या हमीवर परवानगी दिली जाऊ शकते, मात्र आधीच लोकही धास्तावलेले असल्याने गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याबद्दल फार कुणी आग्रही राहणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे मंडळांच्या गणेशोत्सवाला यंदा फुली बसू शकते.
या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विक्रेते एक प्रकारचा धोका पत्करून बाजारात आलेले असले तरी त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तीची मागणी सार्वजनिक मंडळांकडून केली जाते. यंदा जवळपास राहणारच नसल्याने मूर्ती विक्रेत्यांनी आधीच लहान आकाराच्या मुर्त्या आणलेल्या आहेत. थोड्या प्रमाणात घरगुती मुर्त्यांची खरेदी होऊ शकते याचा विचार विक्रेत्यांनी केलेला आहे . गणेशोत्सव फक्त बारा दिवसांवर आलेला असला तरी बाजारात गणेश मुर्त्यांच्या मागणीला अपेक्षेप्रमाणे उठाव असेल कि नाही हे कुणीही सांगू शकलेले नाही .
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2644023985858585/