चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार यांना आज कोपरगाव येथे राजस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
रयत सेनेच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू, रुग्ण, शेतकरी आदींची समाजसेवा करणारे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानतंत्र बहुउद्दीश संस्थेंच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दि ४ मार्च २०२३ रोजी राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गणेश पवार यांनी रयत सेनेच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप,विद्यार्थ्यांना करीअर मार्गदर्शन शिबिरातुन शिक्षणाच्या वाटा याबाबत प्रबोधन करून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्नाना आरोग्य शिबिरांतुन तपासणी करून मोफत औषधी वाटप केले. महिलांची वैद्यकीय तपासणी करून सोनोग्राफी,एक्स रे ,एम आर आय द्वारे मोफत तपासणी शिबिर. शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन, व्यापार्यांना घेराव घालून शेतकर्यांना हमी भाव मिळवून देत शेतकर्यांना आधार देण्याचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समाजात प्रबोधन कार्यक्रम,कोरोना प्रादुर्भावात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाना मोफत औषधी वाटप आदींमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
यासोबत, कोरोना काळात गरीब कुंटुंबाना किराणा साहित्य वाटप,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस टी सुरू करून विद्यार्थ्यांचा शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास सुलभ होण्यास मदत ,दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत आधारकार्ड वितरीत,गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी भरून विद्यार्थी दत्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य ,ग्रामीण भागात विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आंदोलन करून गावकर्यांना विजेचा लाभ मिळवून देण्याचे योगदान,चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सचखंड व महानगरी एक्सप्रेस ला थांबा मिळवून देउन हजारो प्रवाशांना लाभ त्यांनी मिळवून दिला आहे.
या कार्याची दखल घेऊन गणेश पवार यांना कोपरगाव येथे आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे व आ आशुतोषदादा काळे, महानंद दुध संघ मुंबई मा. व्हा चेअरमन राजेंद्र जाधव, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमनाथ डफाळ यांनी केले.