गणेश नगरात बंद घर फोडले : ६४ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । मेहरुणमधील गणेश नगरातील एक बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने, चांदी व रोख रक्कम असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनुस कालू खान (वय ६४) हे मेहरुणमधील गणेश नगरात पत्नी सायरा बानो खान यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा रिजवान ठाणे येथे वास्तव्याला असल्याने १२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून दाम्पत्य ठाण्याकडे रवाना झाले. आज गुरुवारी  २९ जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजता ते घरी आले असता घराच्या कंपाऊंडला कुलूप लावलेले होते. ते उघडल्यावर आतमध्ये गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी तुटलेली होती. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील ड्रावर पलंगावर ठेवले होते. त्यातील ४० हजार रुपये रोख, १२ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनी चैनल पेंडल, सहा हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमच अंगठी असा ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Protected Content