जळगाव प्रतिनिधी । शतपावली करत जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून दोन जणांना हिसकावून दुचाकीने पळ काढल्याचा प्रकार गणेश कॉलनी परिसरात गुरूवारी रात्री घडली होती. या गुन्ह्यातील दोघांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, नागेश अन्नाप्पा खेडगी (वय-४०, रा. वासूदेव पार्क, १०० फुटी रोड, कोल्हे नगर) हे रोज रात्री शतपावली करण्यासाठी जातात. काल २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शहरातील गणेश कॉलनी परिसरातील महावीर क्लासेस व कन्या शाळेच्या दरम्यानच्या रोडवरून जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या हातातील १३ हजार ९०० रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. नागेश खेडगी यांनी तत्काळ आरडाओरड केली. त्यावेळी महाविर क्लासेस जवळ असलेल्या एका तरूणाने चोरट्यांचा दुचाकीने पाठलाग केला. दरम्यान रोज गार्डनकडून मधल्यारस्त्याने ते पसार झाले होते. नागेश खेडगी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती सांगितले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ दिनेशसिंग पाटील यांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. राकेश उर्फ रामा गोकुळ राठोड (वय-१८) रा. सांगवी ता. चाळीसगाव ह.मु. गणपती नगर, चाळीसगाव आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या गुन्ह्यातील मोबाईल ताब्यात घेतला असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उद्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.