जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातून दीड लाख रूपये किंमतीची बुलेट मोटारसायकलची रविवार १४ फेब्रुवारी रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, समाधान सुरेश साळुंखे (वय-३१) रा. जैनाबाद ता. जि.जळगाव हे चालक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीएन १९००) क्रमांकाची बुलेट मोटारसायकल आहे. त्यांनी शहरातील गणेश कॉलनीतील गंधर्व कॉलनीत सार्वजनिक रोडवर शनीवारी रात्री १२ वाजता बुलेट मोटारसायकल पार्किंग लावली होती. दरम्यान, रविवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. बुलेटची परिसरात शोध घेवून मिळून आली नाही. रविवारी रात्री उशीरापर्यंत समाधान साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहे.