गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या गोळीबारात जवान शहीद !

गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोलीमध्ये आज सकाळी माओवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद तर एक गंभीर जखमी झाला आहे.

 

गडचिरोलीतील कोठी गावात दुकानात खरेदीसाठी गेलेल्या जवानावर माओवाद्यांच्या टीमकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुशंत नंदेश्वर जवान शहीद झाला आहे. दिनेश भोसले जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Protected Content