जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत ३१ डिसेंबर रोजीच्या उत्सवासाठी महानगरपालिका हद्दीत केवळ वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय हरीत लवाद यांच्याकडील 9 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 25 डिसेंबर, 2020 रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत दिनांक 31 डिसेंबर, 2020 या उत्सवांच्या कालावधीत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत केवळ रात्री 8.00 ते रात्री 10.00 या वेळेतच फटाके वाजवणे, फोडण्यास परवानगी असेल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांना प्रदान करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.