मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या गुंडांना वाचवण्यासाठी खोटी एफआयआर दाखल केली असून आपली तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला तसेच आपल्यासमोरच तक्रारीचा कागद फाडला असून खोट्या एफआयआर प्रकरणी राज्यपालांची भेत घेणार असल्याची माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात खोटी एफआयआर पोलिसांनी नोंदवली होती. यासंदर्भात दिल्ली येथे गृहसचिव यांच्याकडे गेल्यानंतर ब्रिंग इट ऑन रेकॉर्ड. खरी घटना, सीसीटीव्ही फुटेज सीआयएसएफला हवे असल्याचे सांगण्यात आले. म्हणून हल्ल्यासंदर्भात खोटी एफआयआरबाबत तक्रार नोंदवण्यासाठी आज दुपारी १२ च्या सुमारास खार पोलीस ठाण्यात गेले. मात्र तक्रार नोंदवण्यास देखील नकार देत पोलिसांनी आपल्या समोरच कागद फाडल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
ज्या अधिकाऱ्याने माझ्या नावाने खोटी स्वाक्षरी करीत खोटी एफआयआर केली, यावेळी पोलिसांसमवेत दीड तास चर्चा झाली. दरम्यान एफआयआर खोटी असल्याचे पोलिसांनी मान्य केले, परंतु खोट्या एफआयआर बाबत तक्रार नोंदवून घेण्यासहि पोलिसांनी नकार दिला, असून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, याबाबत बुधवारी दुपारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
तर न्यायालयात जाणार…
कमांडो, सरकारी कर्मचाऱ्याला पोलीस स्थानकाच्या आवारात गुंडगिरी करीत माजी महापौरांनी मारहाण केली, माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, हे सर्व सेक्शन उद्धव ठाकरे सरकारने लावले नाही तर न्यायालयात जाणार, केंद्रीय गृहसचिवांना अपडेट देणार, आणि राज्यपालांची भेट घेणार, असे सोमय्या यांनी सांगितले.