मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना इशारा देखील दिला आहे.
सध्या शिंदे आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली असून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. यातच ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अतिशय आक्रमक भाषण केल्याने शिंदे गट खवळला आहे. ठाकरे यांनी ‘खोके सरकार’ असे टीकास्त्र सोडल्याने वातावरण तापले असून फ्रिजमधून खोके कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना दिला आहे.
मुंबई महापालिकेतील अनेक कंत्राटे आणि व्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरू झाली असून या अनुषंगाने महापालिकेत प्रदीर्घ काळ सत्तेवर असणार्या ठाकरे गटाला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न हे राज्य सरकारकडून होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.