जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बु येथील २७ वर्षीय तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, निकेश जयसिंग पाटील (२७) रा. खेडी ता.जि.जळगाव हे पत्नी मीनासह भाड्याच्या घरात राहतात. शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निकेश याने आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आली जीवनयात्रा संपविली. पतीने गळफास घेतल्याचे समजात तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. यावेळी शेजारच्यांनी तात्काळ त्यांच्या घरी धाव घेत निकेशला खाली उतरवून उपचारासाठी देवकर कॉंलेज मधील शासकीय वैद्यकीय आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी नेले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी त्याची तपासणी केली असता. त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्याखबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्राथमिक पुढील तपास पो.ना.महेंद्र गायकवाड, पो.कॉं. शांताराम पाटील हे करीत आहे.