Home Cities एरंडोल खेडी खुर्द येथे गावठी दारू भट्टीवर धाड

खेडी खुर्द येथे गावठी दारू भट्टीवर धाड

0
29

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी खुर्द येथे गावठी दारूच्या भट्टीवर धाड टाकून दारूच्या रसायनांसह एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. या अनुषंगाने पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील खेडी खुर्द येथे छापा टाकण्यात आला. यात वसंत बुधा सोनवणे, (वय-५० रा. खेडी खुर्द ) हा गुळ,नवसागर,पाणी मिश्रीत भट्टीच्या साधनासह आढळून आला. त्याच्या ताब्यातील २०००/-रु.किंमतीचे दोन ड्रम ५० लिटर कच्चे रसायन; ३०००/-रु.किंमतीचा पत्री ड्रम; १०० लिटर उकळते पक्के रसायन; ५००/-रु.किंमतीची १० लिटर हातभट्टीची दारू व भट्टीचे साधन एकुण ५,५००/- मिळुन
आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरूध्द एरंडोल पो.स्टे.ला प्राव्ही.गु.र.नं.२७/२०२० महा.प्रोव्ही.का.क. ६५ (ई),(फ),(ब),(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पाटील, राहुल बैसाणे, मिलिंद कुमावत व राहुल बैसाणे हे करीत आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound