खुशखबर! आषाढी एकादशीच्या महापूजे दरम्यान मुखदर्शन राहणार सुरू

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत दिले आहेत. आषाढी एकादशीला   मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतो. यावेळी आषाढी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था केल्याने पर्वणी काळात  जवळपास दीड ते दोन लाख ज भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार  आहे.

 

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.

Protected Content