भुसावळ प्रतिनिधी । बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खुनाच्या १४ सप्टेंबर रोजीच्या गुन्ह्यातीलफरार चौथा आरोपी पोलिसांनी शिताफीने आज पकडला आहे . तो शहरातून अन्यत्र निघून जाण्याच्या प्रयत्नात होता .
या गुन्ह्यात फरार आरोपी शेख आमिर शेख युसुफ (वय-18, रा.पंधरा बंगला भुसावळ ) याच्याबद्द्ल .उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड याना खात्रीशीर बातमी खबऱ्याकडून मिळाल्यावर त्याचा ठावठिकाणा माहिती झाला होता त्यानंतर त्याला 14 सप्टेंबररोजी रात्री 11.00 वाजता भुसावळात पंधरा बंगला भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात ( गुरन 836/20 भा द वि कलम- 302, 143, 144, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.का. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख यांनी केली.