भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोळी वाडा भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनातील आरोपी धीरज गणेश शिंदे याच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी शहरातील कोळी वाडा भागात एका दूध विक्रेत्याची भर दिवसा हत्या झाली होती. या प्रकरणी धीरज गणेश शिंदे याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, कोठडीत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्याने आपल्याकडे गावठी पिस्तल असल्याची माहिती दिली. त्याने हे पिस्तूल एका ठिकाणी लपवून ठेवले होते. यानुसार पोलिसांच्या पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. ही कारवाई शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोबे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.