रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे पहाटेच्या सुमारास नर चितळ मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशीकी, रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक ऐनपुर रोड लागत नर प्रजातीतील चितळ याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान चितळ हा रहदारी भागात आलाच कसा? अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास हा चितळ रहदारी भागात आल्याने कुत्र्यांनी त्याला चावा दिल्याचे ही दिसून येत आहे. तसेच चीतळाची शेपूट ही नसल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर काही वेळात वनविभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लोहार बिटचे वनरक्षक युवराज मराठे यांनी पांचनामा केला. या प्रसंगी पाल येथील वनपाल डी.जे. रायसिंग, रावेर वनपाल रवी सोनावणे, वनपाल राजेंद्र सलदार, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास रावेर परिक्षेत्र अधिकारी अजय बावने करित आहे.