खा. संजय राऊत यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन

जळगाव, प्रतिनिधी | हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त शहरातील उद्योजक खुबचंद साहित्या यांच्या संकलपनेतून तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

खूबचंद साहित्या हे दर वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिनदर्शिका प्रकाशित करत असतात त्याचे प्रकाशन 1 जानेवारी रोजी न करता 23 जानेवारी रोजी करून मा. बाळासाहेब ठाकरे यांना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करत असतात या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी खूबचंद साहित्या यांच्या समवेत जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते

Protected Content