जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आली.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खा.निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. खा. राणे यांच्यावर त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आली.
निलेश राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर वेड्यांच्या इस्पितळात उपचार करावे अशा, सतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, जितू साळुंखे, शेख शाकीर अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, वैद्यकीय आघाडीचे मोहसीन पिंजारी, राहुल पारचा, युवासेना उप जिल्हा प्रमुख विशाल वाणी, समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, ईश्वर राजपूत, महीला आघाडीच्या मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल वाणी, राणी सोनवणे, चारुलता सोनवणे, नीलू इंगळे, व्यापारी सेनेचे पुनम राजपूत, अमित जगताप, विजय बांदल, जितू बारी, विजय राठोड, बजरंग सपकाळे, डॉ. जुबेर शेख, आबिद खान, प्रीतम शिंदे, गजू कोळी, तुषार पाटील, संस्कार मोहिते, सोमसिंह राजपूत, विशाल काळे, विवेक सारसर, रोहित दाभोळे, आदर्श चव्हाण, विलास पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.