खासदारांचे पेन्शन बंद करा : कॉंग्रेसच्या खासदाराचीच मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे जुन्या पेन्शन योजनेवरून दावे-प्रतिदावे होत असतांना कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरेकर यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून अनोखी मागणी केली आहे.

 

 

चंद्रपूर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी अनोखी मागणी केली असून याबाबत टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यात नमूद केले आहे की,   केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक खासदारांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यातील माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही पाठविले.

 

धानोरकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, एकूण ३०० माजी खासदारांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या खासदारांच्या कुटुंबीयांनाही पेन्शन दिली जात आहे. काही माजी खासदार आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम आहेत. तेही अजून पेन्शन घेत आहेत. त्यांना निवृत्ती वेतन देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जे खासदार आयकराच्या ३० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येतात, त्यांना पेन्शनचा लाभ देऊ नये. कोणताही देशभक्त माजी खासदार माझ्या या मागणीला विरोध करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Protected Content