खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या शुल्कात ५० टक्के कपात ; राज्य सरकारचा सामान्यांना दिलासा


मुंबई (वृत्तसंस्था)
खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे.

 

आयसीएमआरने सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने कोरोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता. त्यानुसार खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आल्याची माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतके शुल्क रुग्णाला द्यावे लागत होते.

Protected Content