खासगीकरणाच्या विरोधात टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पायाभूत सुविधांमध्ये गणल्या जाणाऱ्या टपाल सेवेचे होत असलेले खासगीकरणाच्या विरोधात ऑल इंडीया पोस्ट इंम्प्लाईज युनियनच्यावतीने टपाल कर्मचारी यांनी बुधवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

सरकारी सेवेचे खासगीकरण करण्यासाठी सरकारने जणू विडाच उचलला आहे. रेल्वेसह व संरक्षण खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू आहे. आता पायाभूत सुविधांमध्ये गणल्या जाणार्‍या टपाल सेवेचे सुद्धा खासगीकरण करण्याचे धोरण आखले जात आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील व इतर कामगारांवर उद्भवलेली भयानक परिस्थिती पाहता, यापुढे  खाजगीकरण होत असल्याने टपाल कर्मचारी चिंतेत पडले आहे. टपाल खाते तोट्यात असल्याचे दाखवून कर्मचार्‍यांचे शोषण व पिळवणूक चालू आहे. या निर्णयाच्या विरोधात बुधवारी १० ऑगस्ट रोजी ऑल इंडिया पोस्ट एम्प्लाईजच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या धरणे आंदोलनात संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत ठाकूर, भूषण मोरे, सतीश पाटील,  सुनील पारधी, डी. बी. इंगळे,  संतोष जलांकर, नंदू पाटील, अशोक सपकाळे, सुरेश चौधरी, हेमंत ठाकूर, अतुल ठाकुर, श्रीनिवास ठाकूर, निलेश सूर्यवंशी, पल्लेश देशमुख, चेतन पाटील, राजू महाजन, रामसिंग निकम, देवा सपकाळे, गणेश चौधरी, योगेश गणोरे, प्रताप जाधव, देविदास निकम, जयदीप मोरे, ईश्वर पाटील, रवी पाटील, ज्ञानेश्वर वासनकर, रवी पाटील, कल्याणी पाटील, वंदना बाविस्कर यांच्यासह आदींनीसहभाग नोंदविला होता.

Protected Content