बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीगजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे यांच्यातर्फे खामगाव ते शेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेत ५१० भाविकांनी सहभाग नोंदविला होता.
या दिंडीची सुरुवात सकाळी 8 वाजता खामगाव येथील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर येथून श्री संत गजानन महाराज यांचा आरतीने सुरुवात झाली. तथापि, एखादा रविवार आणि आपण अध्यात्मिक करता द्यावा. याकरिता मागील सहा वर्षापासून ठाणे येथील श्री गजानन महाराज उपासना केंद्राच्या माध्यमातून साधारणता डिसेंबर महिन्यात पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. मुंबईहून प्रथम शेगाव येथे एकत्रित झाल्यावर साधारण दुसऱ्या दिवशी खामगाव ते शेगाव असे जवळपास 16 किलोमीटर हे उपासना मंडळाचे सदस्य गण गण गणात बोतेचा नाम जप करीत शेगाव गाठतात. अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध असा त्यांचा हा प्रवास वाखाणण्याजोगा असतो. या यावर्षीच्या पायदळ दिंडीमध्ये जवळपास 510 जणांचा सहभाग होता. त्यामध्ये वय वर्ष 11 ते 72 वर्षापर्यंतचे सेवेकरी यांनी गण गण गणात बोतेचा नाम जप करीत खामगाव ते शेगाव आसा 16 किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी राणा एज्युकेशनल सावरचे अध्यक्ष राणा अशोकजी सानंदा, शाळेच्या प्राचार्य निखाडे व शाळेचे कर्मचारी यांचे विशेष उपस्थिती होती.
ठाणे येथील श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे चे संस्थापक अध्यक्ष मधूरा मराठे, अध्यक्ष शरदजी गाडगीळ यांच मार्गदर्शनामध्ये विविध जिल्ह्यातील ५१० भाविकांची या पायदळवाडी मध्ये सहभाग होता. सकाळी आठ वाजता निघालेली दींडी जवळपास दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शेगावात पोहोचली. 500 पेक्षा जास्त उपस्थित असलेल्या दिंडी चे सर्वत्र लक्ष वेधून घेत होते. दहा ते पंधरा दिंडीकरी सोबत सहा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही पायदळ दिंडी आता ५०० पेक्षा जास्त गजानन भक्तापर्यंत येऊन पोहोचली आहे. संपूर्ण दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांचे विशेष लक्ष ठेवल्या जाते. सुरवातीचा जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर प्रत्येक सहभागी दिंडीकरी भाविकाला चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था आपुलकीने केल्या जाते. शेगाव मंदिर श्रींच्या महाप्रसादाची ही व्यवस्था केली जाते संपूर्ण नियोजनबद्ध अशी ही ठाणे येथील गजानन महाराज उपासना केंद्राची दिंडी दिवसंन दिवस आपली दिंडी भाविकांन मध्ये वाड करत दाखल होत आहे. हे विशेष..