खामगाव तहसील कार्यालयात रक्तदान शिबीर

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गौरवशाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त खामगाव तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

रक्तदान करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे,नायब तहसीलदार विजय पाटील,निरीक्षण अधिकारी विशाल भगत,मंडळ अधिकारी, तलाठी,तसेच महसूल कर्मचारी  विविध क्षेत्रातील नागरिक व कर्मचारी अधिकारी यांच्या सह यावेळी ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

 

अमृत महोत्सवानिमित्त सर्व देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. खामगाव विभागात सुद्धा विविध उपक्रमांनी हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी मुख्य उपस्थिती खामगाव उपविभागीय अधिकारी  राजेंद्र जाधव ,खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार गजानन बोरले,निरीक्षण अधिकारी विशाल भगत, यासह महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Protected Content