खामगाव : प्रतिनिधी । येथे ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून रविवारीही वीज बिल भरण्याची सुविधा महावितरण कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे .
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे वीज वितरण विभागाला मागील ११ महिन्यापासून ज्या ग्राहकांनी विज बिल भरले नाही त्यांना वीज बिल भरण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे वीज न तोडता बिल वसूल करणे हा आता नवीन प्रश्न उभा ठाकला आहे त्यामुळे खामगाव शहर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांनी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी देखील सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बिल भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे
याबद्दल एक ग्राहक श्रीकृष्ण कराळे म्हणाले की , एकंदरीत खामगाव वीज वितरण विभागातील चमूने सर्व अभियंते ,कर्मचारी ,विज सेवक , बाह्य स्त्रोत कर्मचारी यांच्या माध्यमातून सुरु केलेला या वसुलीच्या अभिनव उपक्रमाँचे ग्राहक निश्चित स्वागत करतील वीज वितरणचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर आणण्याकरिता हातभार लागेल .