रावेर प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाचा रूग्ण वाढत असतांना यावर मात करणार्यांची संख्या देखील वाढत असून तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी असणार्या दोन वर्षाच्या चिमुकलीने या विषाणूवर मात केली असून आज तिला घरी रवाना करण्यात आले आहे.
आज रावेर कोविड सेंटर वरुन खानापुर येथील दोन वर्षीय बालिकेस कोरोना सेंटर वरुन घरी सोडण्यात आले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ एन. डी. महाजन यांनी विशेष लक्ष दिल्याने दोन वर्षीय मुलीने कोरोनावर मात केली आहे.
खानापुर (ता. रावेर ) येथील दोन वर्षीय मुलगी कोरोना पॉझीटीव्ह आली होती. तिला व तिच्या आई-वडील यांना मागिल दहा दिवसांपासुन रावेर कोविड सेंटरला ठेवण्यात आले होते.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन यांनी या दोन वर्षीय चिमुकलीकडे विशेष लक्ष दिल्याने तिने कोरोनावर मात केली आहे.तर तिच्या आई-वडीलांचा रिपोर्ट निगीटीव्ह आल्याने त्यांना देखिल कोविड सेंटर वरुन रवाना केले आहे. या तिघांना पुढील सात दिवस त्यांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागणार आहे.