जळगाव, प्रतिनिधी | खान्देशातील पहिल्या वहीगायन लोककला संमेलनाचे २० व २१ नोव्हेंबरला जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे, या संमेलनाची घोषणा व खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या बोधचिन्हाचे प्रकाशन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी यासाठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे बोधचिन्हाचे प्रकाशन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अजिंठा विश्रामगृह येथे करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, उपस्थित होते. खान्देश लोककलावंत विकास परिषद आयोजित या लोककला संमेलनाची पुर्व तयारी व आढावा परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सादर केला . या संमेलनात खान्देशातील दोन हजार लोककलावंत सहभागी होणार असून शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोककलेचा जागर या संमेलनात करण्यात येणार आहे. लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्या मुरळी ,सोगाड्या पार्टीसह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. खान्देशात प्रथमच होत असलेल्या वहीगायन लोककला संमेलनाच्या आयोजनाबद्दल पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी परिषदेच्या पदधिकारी यांचे अभिनंदन केले व कोविडचे सर्व नियमाचे पालन करून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे पदाधिकारी सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलाल अरविंद पाटील उपस्थित होते