अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारणीची निवड शनिवार दि. ९ जुलै रोजी करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी आशिष पवार यांची तर उपाध्यक्षपदी अमोल पाटील व सविता पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून व. ना. महाजन यांनी काम पाहिले.
समता युवक कल्याण प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या सभेत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्ष साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव पाटील हे होते. त्याच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारणीची निवड आज शनिवार दि. ९ रोजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून समता युवक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष पवार, उपाध्यक्ष म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील, भगिनी मंडळाची प्राथमिक शाळेच्या सविता पाटील तर सानेगुरुजी विद्यालयाचे स्वप्नील पाटील यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मण पाटील, अनिस खाटीक यांची सहसचिव, कोषाध्यक्ष मनोहर पाटील, प्रसिद्धी प्रमुख महेंद्र रामोसे, हिशोब तपासनीस म्हणून हितेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा कार्यकारिणी सह सचिव मनोज पाटील, फय्याज शेख, जयेश शिरसाठ, किशोर बडगुजर, अजय भामरे, आनंदा पाटील, बापूराव ठाकरे आदी उपस्थित होते.