खाजगी केंद्रावर मिळणार प्रीकोशन लस मात्रा

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी –  केंद्र शासन निर्देशानुसार १८ वर्ष वयोगटावरील संसर्ग प्रतिबंधात्मक लस मात्रेच्या प्रीकोशन डोस खाजगी केंद्रावर मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात नागरिकांना खाजगी केंद्रावर प्रीकोशन लस घेता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यात प्राथमिक स्तरावर फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्यानंतर जेष्ठ नागरिक, ४५ ते ६०, १८ ते ४५, १५ ते १७ आणि १२ ते १५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे असे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जात आहे. आतापर्यत जिल्ह्यात ५२ लाख ९ हजार, ५०३ नागरिकांना लसीकरण लाभ देण्यात आलेला आहे. तसेच १० जानेवारीपासून ते आतापर्यत ५१ हजार ३८७ हून अधिक फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्यानंतर जेष्ठ नागरिकाना प्रीकोशन लस मात्रा देखील देण्यात आली आहे.

केंद्र शासन निर्देशानुसार १० एप्रिल पासून १८ वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी खाजगी लसीकरण केंद्रावर प्रीकोशन लस मात्रा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकच केंद्रावर शहरातील विश्वप्रभा हॉस्पिटल येथे २१०० डोसची लस मात्रा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

आतापर्यत जिल्ह्यातील लसीकरण स्थिती

वयोगट             पात्र लोकसंख्या          लाभार्थी      टक्के
१२ ते १४          १४६०१६                   ४७३०६        ३२.४०
१५ ते १७          २२५८९८                   १३४४५८       ६०
१८ ते ४५          १७५४०६९ १ला डोस   १५४५२९४      ८०
२रा डोस                                         १११००३०     ५६
४५ ते ६०         ५९९८९७  १ला डोस                        १०० टक्के पूर्ण
२रा डोस                                         ५०२३९५       ८४ टक्के
प्रीकोशन डोस  १६५८२९                    ५१३८७         ३१ टक्के

 

खाजगी लसीकरण केंद्रास मान्यता

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण तसेच जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी १० जानेवारी २०२२ पासून प्रीकोशन/बूस्टर लस मात्रा उपलब्ध असून केंद्र शासन निर्देशानुसार १० एप्रिल पासून जळगाव येथे खाजगी लसीकरण केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना दुसरा डोस घेऊन ९ महिने कालावधी पूर्ण झाला असेल त्यांना प्रीकोशन लस घेणे शक्य होणार आहे.
अभिजित राऊत,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष

Protected Content