जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत सुरू असणार्या आर.के. वाईन्स या दुकानदाराशी साटेलोटे असण्याच्या आरोपातून एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक आणि सहकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
आर.के. वाईन्स या मद्यविक्री करणार्या दुकानाचा परवाना अलीकडेच रद्द करण्यात आला होता. यानंतर या दुकानदाराला मदत करणारे पोलीस कर्मचारी रडारवर आले होते. यात एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह मनोज सुरवाडे, जीवन पाटील, भारत पाटील व संजय जाधव या चार कर्मचार्यांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
लॉकडाऊन सुरू असतांनाही अनेक ठिकाणी वाढीव दरात दारू सर्रास मिळत असल्याचे दिसून आले होते. यात जळगावातील आर.के. वाईन्स आणि नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. या दोन्ही दुकानांच्या परवानाधारकावर बड्या राजकीय हस्तींचा हात असल्याचे दिसून आले होते. यातच आता यामध्ये थेट पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा सहभाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००