चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे बहिणीकडे राहण्यासाठी आलेली मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलीला लग्न करणार असल्याचे सांगून पळवून नेत तिच्यावर तीन दिवस शारिरीक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील कालीकुंडी येथील १७ वर्षीय मुलगी ही चोपडा येथे राहत असलेली बहिणीकडे ८ जुलै २०२२ रोजी राहण्यासाठी आली होती. दरम्यान मोठी बहिण हीने अल्पवयीन बहिण हिला “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे बोलून दोघा बहिणींमध्ये भांडण झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने आरोपी सचिन उर्फ टिंगल्या मेवा रा. कालीकुंडी जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याला मला घेण्यासाठी ये असे सांगितले. त्यानुसार २९ जुलै २०२२ रोजी आरोपी सचिन मेवा हा चोपडा येथे आला. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे सांगून अल्पवयीन मुलीला हरीयाणा येथील मित्राकडे चार दिवस राहिले. तिथे सचिन आणि अल्पवयीन मुलीसोबत तीन वेळा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तेथून देघे सेंधवा (मध्यप्रदेश) येथे नातेवाईकांकडे थांबले. तिथेही सचिन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, पिडीत मुलगी ही वारला (मध्यप्रदेश) येथे आल्यानंतर वारला पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याबाबत शुन्य क्रमांकाने संशयित आरोपी सचिन उर्फ टिंगल्या मेवा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येवून गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.