यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथिल एका १६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
डांभुर्णी तालुका यावल येथील राहणारा कैलास चंद्रकांत कोळी वय 16 हा दहावीचा विद्यार्थी असलेला तरुण मुलगा काल दिनांक 2 पासून घरातून तसेच गावातून बेपत्ता झालेला होता त्याचा शोध सुरू असताना आज दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास कोणाला तरी तो डांभुर्णी शिवारातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचे वृत्त कळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
कैलास कोळी तरुण हा मयताच्या डोळ्यात काड्या खुपसून आणि डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आपल्या पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पंचनामा करण्यात असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहे. यावल येथील ग्रामीण रूग्णालया शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस स्टेशनला खून संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.