खळबळजनक : कोर्टाच्या आवारातील रेस्टहाऊसमध्ये महिलेवर बलात्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील राउस एवेन्यू कोर्टाच्या आवारातील रेस्टहाऊसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 

पिडीत महिलेला काही प्रकरणात न्यायालयात यावे लागत होते. २२ जून रोजी आरोपी राजेंद्र राऊस एव्हेन्यू कोर्टातील कोर्ट नंबर 308 च्या रेस्ट रूममध्ये ही घृणास्पद घटना घडवून आणली. दिल्ली पोलीस या खळबळजनक घटनेचा सखोल तपास करत आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरूद्ध बलात्काराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी राजेंद्रला अटक केली आहे.

Protected Content