जोधपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृतदेह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेत ६ प्रौढ आणि ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सात महिला आणि चार पुरुष असल्याचे कळते.
हे सर्व मृत व्यक्ती पाकिस्तानातून विस्थापित होऊन आले होते. प्रथमदर्शनी विषारी गॅस अथवा रासायनिक विष प्यायल्याने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. देचू ठाणे हद्दीतील लोडता परिसरातील ही घटना आहे. या कुटुंबातील एक बहीण, जी व्यवसायाने नर्स आहे, आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ती येथे आली होती. या बहिणीने पहिल्यांदा १० लोकांना विषारी इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने स्वत: ला इंजेक्शन देऊन संपवले असावे अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या तपासणीदरम्यान या कुटुंबात एकूण ११ जण असल्याचे समजले आणि एक बहिण येथे आली होती. यानंतर, त्याठिकाणी एकूण १२ लोक उपस्थित होते, त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एक सदस्य शेताच्या दिशेकडे गेला होता, त्याठिकाणी रात्री त्याला झोप आली, त्यानंतर सकाळी उठून तो घराकडे आला, तेव्हा घरातील सर्वच मृत्यू झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी यात खून, आत्महत्या आणि अपघाताचा या सर्वबाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे.