Home Uncategorized खराब झालेले चेंबर्स त्वरित दुरुस्त करा – भीमपुत्र ग्रुपची मागणी

खराब झालेले चेंबर्स त्वरित दुरुस्त करा – भीमपुत्र ग्रुपची मागणी

0
39

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील खराब झालेले चेंबर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर त्वरित दुरुस्त करा अशी मागणी भीमपुत्र गृपतर्फे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,   विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील मोठ्या नालीवरील चेंबर पूर्णतः खराब आहे. या चेंबरमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांनी येणाऱ्या  श्री गणेशोत्सव व दुर्गा देवी उत्सव यांच्या मिरवणुका विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळुन जात असतात. त्यामुळे मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर श्रीगणेश भक्त व दुर्गामाता भक्त , महिला, पुरुष, लहान मुलं यांची वर्दळ असते.  त्यामुळे या ठिकाणी नालीवरील चेंबर खुप जीर्ण झाले आहे. यात नागरिक व लहान मुले पडुन मोठया प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते.   मुख्याधिकारी वैभव लोंढे  व बांधकाम विभाग न.पा. यांनी  विसर्जन मिरवणुका निघण्याच्या आत ते जुने जीर्ण झालेले सर्व चेंबर काढुन त्या ठिकाणी नवीन चेंबर लवकरात लवकर बसवावे व त्या ठिकाणी  होणारी जीवित हानी थांबवा अशी मागणी भिमपुत्र ग्रुप फैजपुर शहराध्यक्ष श्रीवर्धन (पप्पु) मेढे यांनी केली आहे.

 


Protected Content

Play sound