मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक उद्धव इंगळे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर संजीव साळवे यांची विशेष उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने प्रफुल प्रभाकर यमनेरे या विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाच्या आरडी परेड साठी विद्यापीठाच्या संघात निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रमुख भाषणात प्राध्यापक इंगळे यांनी महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे देशाचं भविष्य ठरवणारे शिक्षण असते. या महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असतो.
म्हणून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी एनएसएस मध्ये सामील होऊन कुटुंबाचा,समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साधावा, असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉ. साळवे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या कलागुणांमध्ये सहभाग नोंदवून आपला नावलौकिक कमवला पाहिजे, त्यामुळे आजचा विद्यार्थी स्वावलंबी बनेल अशी आशा व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर दीपक बावस्कर तसेच महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा ढाके यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय डांगे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी प्राध्यापक डॉक्टर ताहीर मीर यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.