मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने युवती सभेअंतर्गत एक दिवसीय नववधू व स्वतःचा मेकअप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच ए महाजन हे होते सदर कार्यशाळेच्या प्रशिक्षणाप्रसंगी श्रद्धा ब्युटी पार्लर मुक्ताईनगरच्या संचालिका राठोड मॅडम या उपस्थित विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या आणि त्यांनी प्रत्यक्षपणे नववधूचा व स्वतःचा कसा मेकअप करावयाचा असतो, याचे प्रशिक्षण या निमित्ताने दिले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.संजीव साळवे यांनी केले तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना सन्माननीय प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन यांनी स्वयंरोजगारावर भर देत अशा कार्यशाळा या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार निर्माण करण्याचे संधी उपलब्ध करून देतात आणि म्हणूनच महाविद्यालय अशा कार्यशाळांचं आयोजन करीत असते असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा.डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी केले.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला 54 विद्यार्थिनींनी नाव नोंदवलेले असून जवळजवळ 50 विद्यार्थिनींनी सदर प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतला आणि स्वयंरोजगाराच्या काय संधी आहेत. या संदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाच्या निखिल रायपुरे, शितल भोई, शुभम गायकवाड, निखिल यमनेरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.