खडसेंच्या याचिकेवर २४ फेब्रुवारीला सुनावणी

 

 

मुंबई प्रतिनिधी । भोसरी येथील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता २४ फेबु्रवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ईडीने आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार होती. तथापि, आज याचा युक्तीवाद पूर्ण झाला नाही. परिणामी, ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यावर आता २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

 

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवले होते.

Protected Content