एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खडके बु ॥ येथील अनाथ निराधार मुला-मुलींना सुप्त गुणांना चालणा मिळावी यासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा घेवून विजेत्यांना बक्षिस देण्यात आले.
खडके येथील अनाथा निराधार मुला-मुलींच्या बालगृहात सोशल डिस्टन्सिंग ठेवून परमेश्वरी महिला गृपच्या वतीने समुपदेशक डॉ. विद्या चौधरी, प्रियंका जावळे, भावना पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे मुलांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करून मोलाचे मार्गदर्शन आणि समुपदेशन केले. यावेळी स्पर्धा घेऊन प्रदिप पाटील यांनी थोर पुरूषांची पुस्तक प्रथम, व्दीतीय, तृतीय आलेल्या मुलामुलींना बक्षिस म्हणून दिले. यावेळी सर्व सहभागी बालकांना संगिता शिरीष यादव यांनी चटई, तर मिना बसंत आठवाणी यांनी कुरकुरे, केक, मास्क यांचे वाटप केले. याप्रसंगी या आठवड्यात वाढदिवस येणाऱ्या देविका गायकवाड आणि धनश्री सोनवणे यांचा वाढदिवस साजरा केला.
कार्यक्रमासाठी डॉ.विद्या चौधरी, प्रियंका जावळे, भावना पाटील, सौ.यादव, सौ.आठवाणी उपस्थित होते. सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले तर कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, तुषार अहिरे, ॠषीकेश ठाकरे, गणेश पंडीत, अरुणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.