भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खडका ग्रामपंचायत तर्फे चौदाव्या वित्त आयोगातुन दोन घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्यांचे लोकार्पण ग्रामपंचायत कार्यालय आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सरपंच अनिल महाजन, ग्राम पंचायत सदस्य रईस खान लोधी, भैय्या महाजन, गजानन सरोदे, शब्बीर बागवान,ज्ञानेश्वर आमले, मुजीब काज़ी, शामसिंग पाटील, रूपाली आमले, किरण भोळे, अडकमोल मॅडम,ग्राम विकास अधिकारी प्रितम शिरतुरे आदी उपस्थित होते. या दोन घंटागाड्यांमुळे ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता ठेवण्यास मदत होणार असून अजुनही काही घंटागाड्या खरेदीसाठी प्रयत्न राहणार असल्याचे सरपंच अनिल महाजन व सदस्यांनी याप्रसंगी सांगितले.