Home धर्म-समाज खडकदेवळा बु ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम (व्हिडिओ)

खडकदेवळा बु ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम (व्हिडिओ)

0
36

पाचोरा, नंदू शेलकर | तालुक्यातील खडकदेवळा बु येथील ग्राम पंचायतीतर्फे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 

खडकदेवळा ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवत रस्त्यावरील कचरा गोळा केला. यावेळी जे. सी. बी. च्या साह्याने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहीम राबवत जिल्हा परिषद शाळेच्या परिसर स्वच्छ केला. कचरा उचलण्यासोबतच या आवारात वाढलेले गवत तसेच काटेरी छुडुपे देखील काढले. दिपावलीच्या सणासुदीच्या दिवसात हिवरा नदीच्या लगत असलेल्या कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खडकदेवळा ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता माहिमेमुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. यावेळी खडकदेवळा बु” ग्राम पंचायतीचे सरपंच प्रविण पाटील, शिवसेनेचे विभाग प्रमुख वाल्मिक पाटील, ग्राम पंचायत सदस्य दिनकर साठे, हबीब शेख, मुकेश पाटील, सुदाम वाघ, युवा नेते बापु पाटील, ग्रामसेवक रविंद्र शेळके, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/266572898582440

 


Protected Content

Play sound