फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर येथे सुरू असणारा खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात यावा असे निर्देश प्रशानातर्फे देण्यात आलेले आहेत.
परंपरेनुसार होळी सणासोबत शहरातील खंडोबा महाराज देवस्थानातर्फे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यानुसार होळीपासून यंदादेखील यात्रोत्सव सुरू झालेला आहे. तथापि, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील सर्व सार्वजनीक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आलेली असून या पार्श्वभूमिवर, तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी खंडोबावाडी देवस्थानाचे प्रमुख महामंडलेश्वर पुरूषोत्तमदासजी महाराज यांना एका पत्राच्या माध्यमातून यात्रोत्सव स्थगित करण्यात यावा असे निर्देश दिलेले आहेत. यात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून यामुळे राज्य सरकारने सार्वजनीक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यानुसार खंडोबा देवस्थानाची यात्रा आता स्थगित करण्यात यावी असे निर्देश या पत्रात देण्यात आलेले आहेत. या पत्राची प्रत प्रांताधिकार्यांनाही पाठविण्यात आलेली आहे.