भुसावळ : प्रतिनिधी । खंडाळा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हा सरचिटणीस तथा ग्रा पं सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद ) यांच्याकडे केली आहे
खंडाळा गावात मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली होती त्यात नऊ प्रकारची कामे मंजूर होती सर्वे, उद्भभव ( बोअर ), पंप हाऊस, यंत्रसामग्री , रायझिंग मेन, जलकुंभ, वितरण व्यवस्था, ताराचे कंपाऊंड, ट्रायल, अशा या कामाची एकूण किंमत 42 लाख 58 हजार 133/- रुपये आहे त्यापैकी कामाचा सर्वे करण्याची गरजच नाही कारण उद्धभव हा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे उद्भभव विहीर पाटबंधारे विभागाच्या बुडीत क्षेत्रात आहे या व्हीरीसाठीचा खर्च २२ लाख संशयास्पद वाटतो रायझिंग मेनसुद्धा उद्भभवपासून गावाच्या जुन्या विहिरीपर्यंत बुडीत क्षेत्रात आहे जुन्या विहिरीपासून जुन्या रायझिंग मॅटला जोडली गेलेली आहे त्यामुळे तीसुद्धा 5 लाख 55 हजार 20/- रुपयात केली असेल असे वाटत नाही वितरण व्यवस्थाही गावात असताना मक्तेदाराने फक्त ठीकठिकाणी तुकड्यांच्या स्वरूपात 35 ठिकाणी तुकडे करून टाकलेली आहे एकच ठिकाणी डबल नावे आढळतात दलित वस्तीमध्ये वितरण व्यवस्था केलीच नाही दलितांना दूषित पाण्यापासून बाधा झाली तर जबाबदार कोण ?, ससा प्रश्न विचारला जातो आहे दलित वस्तीला शाखा अभियंता व मक्तेदार यांनी वाऱ्यावर सोडले आहे , असा आरोप केला जात आहे . ही व्यवस्थासुद्धा अंदाज पत्रकातील 6 लाख 60 हजार रुपयात केली असेल असे वाटत नाही वायर फिक्सिंग ताराची असल्यामुळे त्यासाठीसुद्धा 1 लाख 17 हजार रुपये खर्च झाला असेल असे वाटत नाही तेथे पूर्वी लोखंडी अँगलसहित तार फिक्सिंग होती आताची फिक्सिंग त्याच अँगलवर करण्यात आलेले आहे वितरण व्यवस्था अखंड स्वरुवात टाकलेली नाही उद्भभव पाटबंधारे तलावाच्या हद्दीत आहे म्हणून त्यासाठीचा 53 हजार रुपये खर्चसुद्धा संशयास्पद वाटतो आहे म्हणून या योजनेची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी निवेदनात ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी मागणी केली आहे